मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए ( Special PMLA court ) कोर्टात सुनावणी करण्यात आली. त्यावेळी अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून आज युक्तिवाद करण्यात आला. वकिलांनी तपास यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहे. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी असणाऱ्या एक ते दोन दिवस अगोदरच तपास यंत्रणा धाडी टाकत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी ( Advocate Vikdram Chaudhari ) यांनी आज न्यायालयात केला आहे.
मनी लॉंड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने मागील वर्षी नोव्हेंबर ( ED arrest Anil Deshmukh ) महिन्यात अटक केली होते. तेव्हापासून अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहे. अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांनी अनिल देशमुख यांच्यावतीने युक्तीवाद करीत असताना ते म्हणाले अनिल देशमुख यांचे वय 73 ( Anil Deshmukh 73 Age ) आहे. त्यांना काही शारीरिक व्याधी आहेत. 3 महिन्यांहून अधिक काळ तुरुगांत आजारी आहेत. म्हणून जामीन मागत असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री म्हणून अडकविले जात असल्याचेही अनिल देशमुखांच्या वकिलांमार्फत सांगण्यात आले.
हे प्रकरण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या वक्तव्यावर केस आधारलेली आहे. निरीक्षण असे ही आहे, की या प्रकरणात सुनावणी होण्यापूर्वी देशमुख कुटुंबियांवर रेड टाकली जाते. असा आरोपदेखील आज न्यायालयासमोर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत 14 वेगवेगळ्या दिवशी केंद्रीय तपास यंत्रणानी आतापर्यंत 70 वेळा छापेमारी केली आहे. 21 एप्रिल 2021 ला पहिल्यांदा सीबीआयने प्राथमिक आरोपपत्र ( FIR ) दाखल केली आहे.