मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना (Former Home Minister Anil Deshmukh) अटक केली होती ईडीने अटक केल्यापासून ते आर्थर रोड जेलमध्ये आहेत. देशमुख यांनी (दि.04 जानेवारी) रोजी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. (Anil Deshmukh Bail Application) या अर्जावर आज मंगळवार (दि.11) रोजी सुनावणी होणार आहे. (100 crore recovery case) त्यामुळे आज अनिल देशमुख यांना जामीन मिळतो की पुन्हा जेलमधील मुक्काम वाढतो हे पहावे लागणार आहे.
न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7000 पानाचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले
100 कोटी कथित प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर गेल्या 71 दिवसांपासून अनिल देशमुख हे जेलमध्ये आहेत. अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7000 पानाचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच, अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांची पत्नीचा भाऊ यांना देखील सहआरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.
आज न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष
देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख यांच्या जामिनाला ईडीने विरोध दर्शवला असून देशमुख यांनी जामिनासाठी केलेला अर्ज अवैध असल्याचे ईडीने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात सांगितले आहे. आता आज न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.