मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने पाचव्यांदा समन्स बजावले आहे. तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यालाही समन्स बजावण्यात आले आहे. सोमवारी त्यांना चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, संबंधित गुन्ह्यांची माहिती मिळावी असे पत्र अनिल देशमुख यांनी ED लिहिले आहे. त्यामुळे अनिल देशमुख आजही चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता कमी आहे.
100 कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. ईडीने या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या घरांवर छापेमारी करून 4 कोटींची संपत्तीही जप्त केली आहे. तसेच त्यांना आतापर्यंत 5 वेळा चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. मात्र, यावेळी देशमुख यांनी ईडीला पत्र पाठवून ECIR ची कॉपी देण्यात यावी, त्यांना जी कागद पत्र हवी आहेत त्यांची यादी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख ED कार्यालयात येण्याची शक्यता कमी आहे.
यापूर्वी 4 समन्स, ईडीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीला नकार देत बजावले होते तिसरे समन्स -