मुंबई :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्या युक्तिवाद सुरु (ED argument in High Court) होता. त्यात सचिन वाझेच्या वसुली करण्यासाठी अनिल देशमुख यांनी वापर केला (Anil Deshmukh used Sachin Vaze for recovery) असे म्हटले.
अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफर पोस्टिंगमध्ये हस्तक्षेप -त्याचबरोबर आयपीएस अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफर पोस्टिंगमध्ये अनिल देशमुख यांनी हस्तक्षेप केल्याचे पुरावे आहे. देशमुख यांच्या वकिलाने दावा केला होता की, पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक त्यासाठी गठीत समिती करत होती. मात्र देशमुख हे सुरुवातीपासूनच यात हस्तक्षेप करत होते. देशमुख यांनी मनी लॉन्डरिंग करण्यासाठी अनेक शेल कंपनीचा वापर केला (Anil Deshmukh Money Laundering Case) होता. त्यांनी यात आपल्या कुटुंबाच्या सदस्यांचा ही वापर केला आहे.
माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकरिता मुंबईतील बारा रेस्टॉरंटमधून पैसे वसुली करत होते, असा युक्तिवाद आज अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार मंगळवारपासून अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात तातडीने सुनावणी देण्यास सुरुवात केली आहे.
ईडीच्या वतीने वकील अनिल सिंग म्हटले की, राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये देखील अनिल देशमुख हे थेट सहभाग घ्यायचे. या बदल्यांमध्ये अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंती ठिकाणची बदली देण्याकरिता मोठ्या प्रमाणात आर्थिक रक्कम देखील घेण्यात आली होती. ही सर्व रक्कम अनिल देशमुख यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने बनवलेल्या अनेक अनधिकृत कंपन्यांच्या नावावर केली आहे. या संदर्भातील अनेक पुरावे तपास यंत्रणाकडे असल्याचे देखील अनिल सिंग यांनी म्हटले आहे.
ईडीकडून युक्तिवाद -सचिन वाझे यांच्या फोनमध्ये अनिल देशमुख यांचा नंबर वेगळ्या नावाने दाखवत आहे. वाझे यांनी वारंवार आपल्या जबाब असे म्हटले आहे की, त्यांना नंबर एक कडून मुंबईतील बारा रेस्टॉरंट यांच्याकडून वसुली करण्याचे निर्देश होते. तसेच जमा केलेली रक्कम नंबर एकला केली असल्याचा देखील म्हटले आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्या म्हणण्याप्रमाणे अनिल देशमुख या प्रकरणात नंबर एक आहे. असा युक्तिवाद ईडीच्या वतीने आज करण्यात आला आहे. बार मालकांकडून सचिन वाझे यांनी 4 कोटी 70 लाख रुपये गोळा केले होते. ही रक्कम अनिल देशमुख यांच्या मुलाच्या शैक्षणिक संस्थेमध्ये वळविण्यात आली होती, असे देखील अनिल सिंग यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण ?मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.