मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांना 100 कोटी कथित वसुली (100 crore alleged recovery case) प्रकरणात अटक केली होती. आज न्यायालयात त्यांना पुन्हा हजर करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडीत संपली असून त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. त्यामुळे अनिल देशमुख यांना आज जामीन मिळतो की त्यांची पुन्हा जेलमध्ये रवानगी होते, हे आज स्पष्ट होणार आहे. अनिल देशमुख गेल्या 55 दिवसांपासून जेलमध्ये आहे. गेल्या 13 डिसेंबरला अनिल देशमुख यांना 27 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी ( 100 cr Money Laundering Case ) रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली होती. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.
Anil Deshmukh Judicial Custody : अनिल देशमुख यांना पुन्हा जेल की, बेल? आज फैसला - 100 crore alleged recovery case
गेल्या 13 डिसेंबरला अनिल देशमुख (Anil Deshmukh Custody) यांना 27 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची कोठडी संपणार असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत.
अनिल देशमुख
Last Updated : Dec 27, 2021, 1:07 PM IST