मुंबई - अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची विधान परिषदेत मतदानाची परवानगी मिळण्याकरिता उच्च न्यायालयात धाव घेतली ( Anil Deshmukh Nawab Malik runs in High Court ) आहे. मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आता विधान परिषद निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी मुंबई हायकोर्टात प्रयत्न करत आहेत. राज्यसभेसाठी दोघांनाही मतदान करण्याची परवानगी मिळाली नव्हती.
अनिल देशमुखांच्या याचिकेवर उद्या सुनावणी - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला सीबीआयने विरोध दर्शवला आहे आज दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञा पत्रामध्ये म्हटले आहे की सीबीआयकडून दाखल करण्यात आलेले आरोप पत्र पूर्ण असल्यामुळे असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांनी दाखल केलेल्या जामीन अर्ज रद्द करण्यात यावा अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या मंगळवार (दि 14) जून रोजी सुनावणी होणार आहे.
राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरू असतानाच आजी-माजी मंत्री मतदानापासून मुकले होते. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, महाविकास आघाडीला दिलासा मिळाला नाही. नवाब मलिक यांचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. तर अनिल देशमुख यांच्या अर्जावर सुनावणी झाली नाही.