मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची ईडी कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. देशमुख यांना आज मेडीकल चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी त्यांना न्यायालयात हजह करण्यात आले. त्यानंतर विशेष न्यायालयाने वरील निर्णय दिला आहे. दरम्यान, शंभर कोटी कथित वसुली प्रकरणी नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या देशमुख यांच्या मतदारसंघातील एका व्यक्तीला समन्सही बजावण्यात आला आहे.
अनिल देशमुख मेडिकल चेकअपसाठी रुग्णालयात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती (Anil Deshmukh ED Custody)
अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीच्या विरोधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. विशेष कोर्टाने ईडी कोठडी नाकारल्यानंतर अनिल देशमुख यांना अर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आले होते. त्याविराेधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती.
अनिल देशमुखांच्या वकीलाची प्रतिक्रीया अॅड. अनिकेत उज्वल निकम आणि विक्रम चौधरी यांनी बाजू मांडली
अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. देशमुख यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान, ईडीने त्यांच्या कोठडीची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने नकार देत देशमुख यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, देशमुख यांच्यावतीने अॅड. अनिकेत उज्वल निकम आणि विक्रम चौधरी यांनी बाजू मांडली होती.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार, निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचे यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यांत गृहमंत्री अनिल देशमुखांनी कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1 हजार 750 बार आणि रेस्टॉरेंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे असा आरोप त्यांनी केलेला आहे.
हेही वाचा -MLA Son Suicide -'माझा मित्र गेला, मी त्याच्याकडे जात आहे';आमदाराच्या मुलाची आत्महत्या