अनिल देशमुख आज चांदीवाल आयोगासमोर हजर, अँटिलिया प्रकरणातील एटीएसचा अहवाल देण्याची मागणी - अनिल देशमुख चांदीवाल आयोगासमोर हजर
मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी अनिल देशमुख यांनी अँटिलिया स्फोटकं प्रकरणात एटीएसने दाखल केलेल्या अहवालाच्या प्रती देण्याची विनंती केली. अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाला अँटिलिया स्फोटकं प्रकरणात एटीएसने केलेल्या तपासाचा अहवाल रेकॉर्डवर घेण्याची विनंती केली. या अहवालातून परमरबीर सिंग यांचे परम सत्य उघड होणार, असा दावा अनिल देशमुख यांनी चांदिवाल आयोगासमोर केली.
अनिल देशमुख