महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Deshmukh and Malik abstained from Rajya Sabha voting, अनिल देशमुख, नवाब मलिक करू शकले नाहीत मतदान - Mumbai High Court

राज्यसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील आमदारांनी मतदान केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) आणि माजी मंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांना मतदान करता आले नाही. मतदान करू देण्यासंदर्भातील त्यांचे दोघांचेही अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) धाव घेतली होती. मात्र, तिथेही दोघांना दिलासा मिळू शकला नाही.

Nawab Malik, Anil Deshmukh
नवाब मलिक, अनिल देशमुख

By

Published : Jun 10, 2022, 5:33 PM IST

मुंबई -राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरू असतानाच आजी-माजी मंत्री मतदानापासून मुकले आहेत. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, महाविकास आघाडीला दिलासा मिळाला नाही. नवाब मलिक यांचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. तर अनिल देशमुख यांच्या अर्जावर सुनावणी झाली नाही.

न्यायालयाकडून दिलासा नाहीच - उच्च न्यायालयातील प्रयत्नही अपयशी ठरल्याने नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचे मतदान करता आले नाही. अनिल देशमुख यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणीच झाली नाही. न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी होऊ शकणार नसल्याने देशमुख यांच्या वकिलांनी तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्नच केले नाहीत.

देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणीच नाही - विशेष पीएमएलए न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अनिल देशमुख यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणीच झाली नाही. न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी होऊ शकणार नसल्याने देशमुख यांच्या वकिलांनी तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्नच केले नाहीत. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीसाठी विधानभवनात जाऊन मतदान करण्याची संधी मिळालीचनाही. मुंबई उच्च न्यायालयातही या दोघांना दिलासा दिला नाही.

केदी असताना मतदानाचा हक्क नाही - कैदी असून कायदेशीर कोठडीत असताना राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क नाही असा निर्णय देत विशेष पीएमएलए न्यायालयाने गुरुवारी या दोघांचे अर्ज फेटाळून लावल्यानंतर दोन्ही नेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या पार्श्वभूमीवर आज नवाब मलिक यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी मलिक यांच्या बाजूने युक्तिवाद केला गेला. यावेळी मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याबाबत न्या. प्रकाश नाईक यांच्याकडून तातडीचा दिलासा देण्यात आलेला नव्हता. मात्र याचिकेत दुरुस्ती करून योग्य त्या न्यायालयात जाण्याची परवानगी दिली गेली होती.

हेही वाचा - 285 MLA Cast Vote Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी 285 आमदारांनी केले मतदान

ABOUT THE AUTHOR

...view details