महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Andheri East ByPoll : शरद पवारांनी महाराष्ट्राची संस्कृती दाखवली - उद्धव ठाकरे - Andheri East Assembly By Election

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ( Andheri East Assembly Constituency Election ) बिनविरोध म्हणुन शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षाला ( Bharatiya Janata Party ) उमेदवार न देण्याचा आवाहन केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ) पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनीही स्वागत केले आहे.

Andheri East Assembly By Election
Andheri East Assembly By Election

By

Published : Oct 16, 2022, 9:39 PM IST

मुंबई -अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणूक ( Andheri East Assembly Constituency Election ) बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षाला ( Bharatiya Janata Party ) उमेदवार न देण्याचा आवाहन केलं. शरद पवारांच्या या भूमिकेचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ) पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनीही स्वागत केला आहे.

ठाकरेंचे शरद पवारांना पत्र - शरद पवारांनी ही भूमिका दाखवत महाराष्ट्राची संस्कृती समोर आणली असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. कोणत्याही पक्षाचा आमदारांचे निधन होणे हे एखाद्या पक्षासाठी जेवढे दुःखदायी आहे. त्यापेक्षा अधिक कुटुंबासाठी दुःखदायी आहे. महाराष्ट्रात अनेक वेळा इतर राजकीय पक्षाने उमेदवार न देऊन राजकीय संस्कृती दाखवली असल्याची उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यासाठी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना पत्र लिहल आहे.

पक्षाची हानी -राजकीय जीवनात अनेक वर्ष निष्ठेने पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे अचानक आपल्यातून निघून जाणे हे प्रचंड वेदना देणारे असते. यामुळे पक्षाची हानी तर होतेच परंतु त्यांच्या कुटुंबीयांची अपरिमित हानी होते. दिवंगत आमदार रमेश लटकेंच्या अचानक जाण्याने लटके, शिवसेना कुटुंबावर असाच दु:खाचा डोंगर कोसळला. नियमाप्रमाणे पोटनिवडणुक लागली. शिवसेनेने श्रीमती ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचा निश्चय केला. त्यांना निवडणुकीपासून परावृत्त करण्याचाही प्रयत्न दुर्दैवाने विरोधकांकडून झाला.

शिवसेनेने पोटनिवडणुकीत उमेदवार दिला नाही -मात्र, न्याय देवतेने न्याय दिला. वास्तविक महाराष्ट्राचं राजकारण एका उच्च संस्कृती आणि मूल्यांवर आधारलेल आहे. त्याची जपणूक शिवसेनेने सदैव केली. स्व. गोपीनाथजी मुंडे, आर.आर पाटील, भाजपच्या गिरकर ताई, यांच्या दुर्दैवी निधनानंतर शिवसेनेने समाजिक चळवळीतील एका कार्यकर्त्याच्या जाण्याने कुटुंबीयांच्या प्रति संवेदना व्यक्त करताना महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुसरून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार पोटनिवडणुकीत दिला नाही.

पवारांनी महाराष्ट्राचा वारसा दाखवला - ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवार दाखवला. त्यासाठी शिवसेना कुटुंब त्यांच्या बद्दल सदैव आभारी राहील. यशवंतराव चव्हाण, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , विलासराव देशमुख, प्रमोद महाजन , शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला अधिक उंचीवर नेण्याचे काम केले आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे राजकारण अधिकाधिक नैतिक मूल्ये आणि संस्कृतीला जपण्याचे कार्य करेल अशी मला खात्री आहे असे आपले पत्रातून म्हटलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details