महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Summons to Salman Khan : सलमान खानला न्यायालयात हजर राहण्यास सूट; सलमानची हायकोर्टात धाव - Andheri court Summons to Salman Khan

अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टाने एका पत्रकाराने दाखल केलेल्या मारहाणीच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकाविरुद्ध समन्स जारी केले. तक्रारदार अशोक श्यामल पांडे यांनी सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली.

Salman Khan
Salman Khan

By

Published : Apr 5, 2022, 9:39 AM IST

Updated : Apr 5, 2022, 2:37 PM IST

मुंबई -सुपरस्टार सलमान खानला मुंबईतील अंधेरी कोर्टाने समन्स बजावले आहे. न्यायालयाने त्यांना ५ एप्रिलला हजर राहण्यास सांगितले होते. अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टाने एका पत्रकाराने दाखल केलेल्या मारहाणीच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकाविरुद्ध समन्स जारी केले. मात्र न्यायालयाने सलमान खान याला न्यायालयात हजर राहण्यास सूट दिली आहे. तर पुढील सुनावणीची तारीख 9 मे रोजी ठेवण्यात आली आहे.

पत्रकार मारहाणप्रकरणी अंधेरी कोर्टाचे सलमानला समन्स

अभिनेता सलमान खानचे मुंबई उच्च न्यायालयात धाव - सलमान खानवर अंधेरीतील पोलीस स्टेशनमध्ये पत्रकाराला धमकावणे प्रकरणात 2019 मध्ये गुन्हा दाखल होता. दरोडा, हल्ला, गुन्हेगारी आणि धमकी दिल्याचा सलमान खानवर आरोप आहे. या प्रकरणात अंधेरी कोर्टाने सलमान खानला आज हजर राहण्याचे समन्स जारी केले होते. 504, 323, 392,506 (II) आणि 34 IPC यासह आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविरोधात सलमान उच्च न्यायालयात गेला आहे.

काय आहे प्रकरण -अभिनेता सलमान खान अंधेरीच्या डी एन नगर परिसरात सलमान खान सायकल चालवत असताना अशोक पांड्ये यांनी त्याचा जवळपास 15 ते 20 मिनीटे पाठलाग करत व्हिडिओ बनवला. यावेळी सलमानसोबत झालेल्या वादामुळे अशोक पांडे यांनी तक्रार दाखल करून सलमान व त्याच्या बॉडीगार्डविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिडिओ बनवत असल्याने त्याचा सलमानला राग आल्यामुळे सलमान आणि त्याच्या अंगरक्षकाने त्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच शिवीगाळ केली असा आरोप देखील करण्यात आला आहे. तक्रारदार अशोक श्यामल पांडे यांनी सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४, ३९२, ४२६, ५०६ (II) आर/डब्ल्यू ३४ अंतर्गत तक्रार दाखल केली.

Last Updated : Apr 5, 2022, 2:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details