महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Andheri By Election: अंधेरीत पटेल यांच्या जनसंपर्काचा लटकेच्या सहानुभूतीशी संघर्ष

Andheri By Election: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात आता चित्र स्पष्ट झाले असून भाजपचे मुरजी पटेल यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यात थेट लढत होणार आहे. आज पासून दोघांनीही प्रचाराला सुरुवात केली असली तरी या प्रचारात मुरजी पटेल यांचा मतदारसंघात असलेला जनसंपर्क विरोधात लटके यांच्या कामाची पुण्याई आणि सहानुभूती यांच्या जोरावर ऋतुजा त्यांना शह देताना दिसत आहेत. या राजकीय संघर्षात जनसामान्यांच्या स्थानिक समस्या ही तितक्याच महत्त्वाच्या असल्या तर मतदारांचं म्हणणं आहे.

Andheri By Election
Andheri By Election

By

Published : Oct 15, 2022, 7:26 PM IST

मुंबईमुंबईतील अंधेरी पूर्व येथील दिवंगत आमदार रमेश लटके MLA Ramesh Latke यांचा निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेच्या पोट निवडणुकीत आता भाजपाचे मुरजी पटेल आणि शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके Shiv Sena Thackeray Rituja Latka यांच्यात थेट लढत होते आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ऋतुजा लटके यांना अर्ज भरता येणार की नाही. यासाठी महापालिकेने घेतलेली भूमिका आणि भाजपाच्या वतीने त्याला दिली गेलेली हवा यामुळे मतदार संघात अनिश्चिततेच आणि तणावाचं वातावरण काही काळ होतं. अखेरीस कोर्टाच्या आदेशानंतर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला आणि त्यात थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकले.

अंधेरीत पटेल यांच्या जनसंपर्काचा लटकेच्या सहानुभूतीशी संघर्ष

मात्र या सर्व घडामोडींचा ऋतुजा लटके यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघात आपल्या प्रचाराला दणक्यात सुरुवात केली आहे. ऋतुजा लटके यांनी आपल्या पतीने केलेल्या कामांच्या पुण्याइवर आणि शिवसेनेबद्दल असलेली शिवसैनिकांची निष्ठा आपल्या विजयाला निश्चित बळ देऊन जाईल, असा विश्वास ऋतुजा लटके यांना आहे. तर उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी घडलेल्या घडामोडींचा फारसा फरक पडणार नाही, असे मत भाजपच्या कार्यकर्त्यांचे आहे. भाजपाचे कार्यकर्ते विशेषतः महिला कार्यकर्त्या जोमाने प्रचारात उतरलेले आहेत.

लटके यांच्यावर अन्याय नाहीमुंबई महानगरपालिकेने त्यांच्या नियमाप्रमाणे राजीनाम्याची प्रक्रिया करण्यासाठी लटके यांना सांगितले, असेल तर त्यात गैर नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता तोही प्रश्न सुटला आहे. त्यामुळे आता थेट मैदानात उतरून त्यांनी लढाई करावी. मुरजी पटेल यांची जनमानसामध्ये अत्यंत चांगली प्रतिमा आहे. त्यांनी जनतेची अनेक कामे केलेली आहेत. नगरसेवक म्हणून त्यांची या विभागात अतिशय चांगली कामे झालेली आहेत. त्यामुळे आम्ही मुरजी पटेल यांनाच अधिक पसंती देतो आणि तेच निवडून येतील असा विश्वास भाजपचा कार्यकर्ता सरलाबेन यांनी सांगितले.

ऋतुजा लटके यांना सहानुभूतीदरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना विभागातून आणि मतदारांकडून मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळत असल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे नाव गोठवले जाणे चिन्ह गोठवले जाणे ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीला विरोध व्हावा, म्हणून राजीनाम्यासाठी अडवणूक करणे आणि त्यांच्या पतीचे झालेले निधन या सर्व बाबी मुळे ऋतुजा लटके यांच्या बाजूने मतदारांची आपसूकच सहानुभूती निर्माण झाली आहे. या मतदारांमध्ये केवळ मराठी भाषिकच नाही, तर उत्तर भारतीय आणि अन्य भाषिक मतदारांचाही समावेश असल्याचे स्थानिक नगरसेवक संदीप नाईक यांनी सांगितले.

राजकीय संघर्षात स्थानिकांच्या समस्यांचं काय ?अंधेरी मतदारसंघांमध्ये झोपडपट्ट्यांचा विभाग असल्याने या विभागामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची मोठी समस्या आहे. गेल्या चार महिन्यांपासून अंधेरीतील मालपा डोंगरी शांतीनगर या परिसरात पाणी अत्यंत कमी दाबाने येते. अथवा पाणी गढूळ येते. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. उमेदवारांच्या राजकीय संघर्षामध्ये मतदारांच्या या स्थानिक समस्या ही तितक्यात महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्याकडे आधी लक्ष दिले पाहिजे, असे मत स्थानिक संतोष जाधव यांनी व्यक्त केले.

निवडणुकीच्या प्रचारातील मुद्देनिवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजपाकडून ठाकरे शिवसेना ही संपलेली शिवसेना आहे. आता यापुढे शिवसेना जनतेचा विकास करू शकत नाही. मुर्जी पटेल यांचा जनसंपर्क दांडगा असून ते जनतेचा प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न करतील, अशा पद्धतीचा प्रचार करण्यात येतो आहे. भाजपाने शिंदे गटाच्या मदतीने शिवसेनेला संपवण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा यांचा डाव आहे. तसेच शिवसेना ही मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. सातत्याने शिंदे गट आणि भाजपाने गेल्या तीन महिन्यांमध्ये शिवसेना आणि अन्य कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. या विरोधात लढण्याची हीच संधी आहे, असा जोरदार प्रचार केला जातो आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details