मुंबई गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, Anant Chaturdashi असा जयघोष करत गणेश भक्तांनी आज अत्यंत भक्तिभावाने जड अंतःकरणाने निरोप दिला. लाडक्या बाप्पाला विसर्जनासाठी लाखो भाविक मुंबईमधील चौपाट्या Ganapati Visarjan , समुद्र किनारे, कृत्रिम तलाव आदी ठिकाणी जमले होते.
लाडक्या बाप्पाला निरोपमुंबईत गेल्या Ganesh Visarjan 2022 अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार होता. हा प्रसार कमी झाल्याने सर्व निर्बंध हटवण्यात आले होते. त्यानतंर यंदाचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. ३१ ऑगस्टला सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. भाविकांच्या घरात आणि सार्वजनिक उत्सव मंडळाच्या मंडपात बाप्पा विराजमान झाले. भाविकांनी गेले दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केली. Anant Chaturdashi 2022 त्यानंतर आज अनंत चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखो भाविक चौपाटी, समुद्र किनारी, कृत्रिम तलावाच्या ठिकाणी जमले होते. अनेकांना आपला लाडक्या बाप्पाला निरोप देताना अश्रू अनावर झाले होते. मुंबईच्या रस्त्या रस्त्यावर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष ऐकू येत होता.