महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अडसूळ यांची प्रकृती ठणठणीत, ईडीचा न्यायालयात दावा; आज होणार सुनावणी

सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची प्रकृती ठणठणीत असल्याचा दावा, ईडीने मुंबई हायकोर्टात केला. तर जात पडताळणीवर आक्षेप घेतल्याने विनाकारण या प्रकरणात त्यांना गोवल्याची बाजू अडसूळ यांच्या वकिलांनी मांडली. दोन्ही वादी- प्रतिवाद्यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकूण घेतले असून यावर आज (शुक्रवार) सुनावणी होणार आहे.

Anandrao  Adsul's condition is stable, ED claims in court
आनंदराव अडसूळ

By

Published : Oct 1, 2021, 7:00 AM IST

मुंबई - सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची प्रकृती ठणठणीत असल्याचा दावा, ईडीने मुंबई हायकोर्टात केला. तर जात पडताळणीवर आक्षेप घेतल्याने विनाकारण या प्रकरणात त्यांना गोवल्याची बाजू अडसूळ यांच्या वकिलांनी मांडली. दोन्ही वादी- प्रतिवाद्यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकूण घेतले असून यावर आज (शुक्रवार) सुनावणी होणार आहे.

अडसूळ यांची प्रकृती ठणठणीत- ईडी

शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजीत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीचा समन्स बजावले आहे. तसेच त्यांच्या कांदिवली येथील घर आणि कार्यालयातही ईडीने तपास केला होता. ईडीचे अधिकारी आनंदराव अडसूळ यांच्या घरी गेले होते. त्यांची चौकशी सुरु असताना अडसूळ यांची अचानक तब्येत बिघडली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करत अटकेपासून दिलासा देण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यालयात धाव घेतली होती. गुरुवारी न्यायालयात अडसूळ यांच्या विनंती याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान आनंदराव अडसूळ यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना काहीही झालेल नाही असा दावा ईडीने न्यायालयात केला आहे. अडसुळांना गुरुवारी रूग्णालयातून डिस्चार्ज मिळणार, मात्र ईडीचे अधिकारी तिथेच त्यांना ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याने अशा प्रकारचे कारण देत ईडीच्या चौकशीतून अडसूळ पळ काढत असल्याचा दावाही ईडीने केला आहे.

प्रकरणात विनाकारण गोवले -

अडसुळांनी प्रतिपक्षाच्या नेत्याविरोधात जातपडताळणी प्रमाणपत्राची तक्रार दिली होती, म्हणून हे प्रकरण विनाकारण उकरून काढण्यात आल्याचा आरोप अडसुळंच्या वकिलाने उच्च न्यालयालात केला. तर हे प्रकरण एका बँकेच्या आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित आहे. या प्रकरणाचा निवडणूक प्रकरणाशी काहीही संबंध नाही असा प्रतिवाद ईडीने न्यायालयात केला आहे. दोन्ही वादी- प्रतिवादी यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकूण घेतले असून यावर आज (शुक्रवार) सुनावणी होणार आहे.

तपासयंत्रणेनं काम कसे करायचे ?

ईडीचे अधिकारी आनंदराव अडसूळ यांच्या घरी गेले होते. त्यांची चौकशी सुरु असताना अडसूळ यांची अचानक तब्येत बिघडली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, आणखी प्रकृती बिगडल्यामुळे अडसुळांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयात हलविण्यात येत आहे. मात्र, कोविड काळात अत्यवस्थ नसलेल्या रुग्णांना जास्त काळ रुग्णालयात ठेवता येत नाही. म्हणून त्यांना आता दुसरीकडे हलविण्यात येत आहे. अश्या पद्धतीने पळवाटा शोधल्या गेल्या तर तपासयंत्रणेनं काम कसं करायचे ?असा सवाल ईडीने मुंबई उच्च न्यायालयात उपस्थितीत केला आहे.

अडसुळांवर काय आहेत आरोप ?

आनंदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केला होता. तसेच या संदर्भातील पुरावे काही दिवसांपूर्वी ईडीकडे सादर केले होते. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. तर या बँकेत ९ हजार खातेधारक होते. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले आहे. त्यात अडसूळांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळे बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप रवी राणांनी केला होता.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details