महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Anandrao Adsul Bail Application : आनंदराव अडसुळांच्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी तांत्रिक कारणामुळे रद्द

सिटी सहकारी बँक गैरव्यवहार ( Mumbai City Bank Scam ) प्रकरणात शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ ( Anandrao Adsul Bail Pitition ) यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या याचिकेप्रकरणी आज मंगळवार (दि.25) रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे आज सुनावणी होऊ शकली ( Anandrao Adsul Bail Pitition Postpond ) नाही.

anandrao adsul
anandrao adsul

By

Published : Jan 25, 2022, 5:25 PM IST

मुंबई -सिटी सहकारी बँक गैरव्यवहार ( Mumbai City Bank Scam ) प्रकरणात शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ ( Anandrao Adsul Bail Pitition ) यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या याचिकेप्रकरणी आज मंगळवार (दि.25) रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे आज सुनावणी होऊ शकली ( Anandrao Adsul Bail Pitition Postpond ) नाही. त्यामुळे आजही आनंदराव अडसूळ यांना कुठलाही दिलासा मिळाला नसून पुढील सुनावणी 01 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सक्तवसुली संचालनाल ( ED ) ने आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

काय आहे प्रकरण -

आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत 900 कोटी रुपायांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी 27 सप्टेंबररोजी त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवले होते. 27 सप्टेंबररोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर ११ च्या सुमारास ईडीने त्यांना ताब्यात घेतलं. बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली.पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details