मुंबई -आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत विचारवंत राजा ढाले यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने विक्रोळी येथे निधन झाले. त्यांच्यावर आज दादरच्या चैत्यभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन सेना नेते आनंदराज आंबेडकर यांनी राजाभाऊ ढाले यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे म्हटले.
राजा ढालेंच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीत पोकळी निर्माण झाली - आनंदराज आंबेडकर - raja Dhale
ढाले यांचे कार्य आंबेडकरी चळवळीत सोन्याच्या अक्षरांनी लिहिले जाईल, असे मत आनंदराज आंबेडकरांनी व्यक्त केले.
ढाले एक झुंजार नेते होते. आंबेडकरी चळवळीचे ते एक आधारस्तंभ होते. त्यांनी १९७० च्या काळात सामाजिक न्याय चळवळ निर्माण केली. या चळवळीत मोठ्या प्रमाणात युवक सहभागी झाल्यामुळे समाजाला न्याय मिळाला. ढाले यांनी दलित पँथरचे संस्थापक म्हणून कार्य केले. त्यांचे कार्य कायम आंबेडकरी चळवळीत सोन्याच्या अक्षरांनी लिहिले जाईल. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते शेवटपर्यंत बाबासाहेबांच्या विचारा प्रती एकनिष्ठ राहिले आणि त्यांच्या विचारांना कायम मानत राहिले, असे आनंदराज म्हणाले.