मुंबई - कोरोना महामारीची दुसरी लाट अत्यंत वेगाने संपूर्ण देशभर पसरलेली आहे. या भयानक संसर्गाची तीव्रता कमी करण्यासाठी केवळ लसीकरण हाच उपाय असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. लशींचा तुटवडा आणि लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी हे काळजीचे विषय आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे खूप हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने पहिले ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू केलं आहे.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्याकडून मुंबईतील पहिल्या ड्राइव्ह इन लसीकरण केंद्राचे कौतुक - उद्योगपती आनंद महिंद्रा
लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे खूप हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने पहिले ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू केलं आहे. उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही या कल्पनेचे स्वागत केले आहे. पहिल्या दिवशी या ड्राइव्ह इन केंद्रावर लोकांनी कशा प्रकारे लस घेतली, याचा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी बुधवारी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.
दादरच्या (पश्चिम) जे. के. सावंत मार्गावर कोहिनूर टॉवरच्या पार्किंग लॉटमध्ये मंगळवारी (4 मे) या लसीकरण केंद्राचे उद्घाटन झाले. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना रांगेत उभे राहावे न लागता त्यांना गाडीत बसूनच लस घेता आली. पहिल्या दिवशी 417 जणांनी या केंद्रावर लस घेतली.
ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रांवर रांगेत उभे राहावे लागत होते. तसेच अनेक हेलपाटेही मारावे लागत होते. त्यामुळे ड्राइव्ह इन प्रकारच्या लसीकरण केंद्राचे अनेकांनी स्वागत केले आहे. उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही या कल्पनेचे स्वागत केले आहे. पहिल्या दिवशी या ड्राइव्ह इन केंद्रावर लोकांनी कशा प्रकारे लस घेतली, याचा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी बुधवारी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.