महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिव्यांगाचे आरपीएफ जवानाने वाचविले प्राण - panvel railway station

पनवेल रेल्वे स्थानकात रोहा ईएमयूमध्ये चढताना तोल गेलेल्या दिव्यांग व्यक्तीला रेल्वे सुरक्षा बलाचे हवालदार हरेश महल्ले आणि उपनिरिक्षक रेणु पटेल यांनी रेल्वेखाली जाण्यापासून वाचविले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिव्यांगाचे आरपीएफ जवानाने वाचविले प्राण
चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिव्यांगाचे आरपीएफ जवानाने वाचविले प्राण

By

Published : Feb 6, 2021, 10:56 AM IST

नवी मुंबई : चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दिव्यांगाला आरपीएफ जवानांनी वाचविल्याची घटना पनवेल स्थानकात घडली आहे. पनवेल रेल्वे स्थानकात रोहा ईएमयूमध्ये चढताना तोल गेलेल्या दिव्यांग व्यक्तीला रेल्वे सुरक्षा बलाचे हवालदार हरेश महल्ले आणि उपनिरिक्षक रेणु पटेल यांनी रेल्वेखाली जाण्यापासून वाचविले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे

अशी घडली घटना
शुक्रवारी 5 फेब्रुवारी रोजी ही घटना पनवेल रेल्वे स्थानकात घडली. सुरक्षा दलाचे जवान हरेश महल्ले आणि रेणु पटेल हे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 5 ते 7 वर गस्त घालत होते. यावेळी फलाट क्रमांक 7 वर रोहाकडे जाणारी ईएमयू निघाली. यावेळी एक दिव्यांग व्यक्ती गाडीत चढण्याचा प्रयत्न करताना घसरला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर उपनिरिक्षक रेणु पटेल यांनी तत्काळ फलाटावर जवळच असलेल्या हवालदार हरेश महल्लेंना ओरडून मदत करण्यास सांगितले. यानंतर महल्लेंनी तत्काळ समयसूचकता दाखवून या व्यक्तीला ओढून फलाटावर घेतले. सुदैवाने यात त्याला कसलीही इजा झाली नाही. या व्यक्तीचे प्राण वाचविणाऱ्या दोन्ही जवानांवर कौतुकाचा वर्षाव आता होत आहे. ही घटना स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

संबंधित व्यक्ती रोहा येथील रहिवासी

या घटनेतून बचावलेले दिव्यांग व्यक्ति प्रल्हाद पाटील( वय 33 वर्षे ) हे रोहा येथील रहिवासी आहेत. त्यांनी आपले प्राण वाचविल्याबद्दल हवालदार हरेश महल्ले आणि उपनिरिक्षक रेणु पटेल यांचे आभार मानलेत. दिव्यांग व्यक्तीचे प्राण वाचविल्याबद्दल पनवेल स्टेशन व्यवस्थापक नायर यांनीही दोघांचा उचित गौरव करण्याची शिफारस वरिष्ठांकडे केल्याचे सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details