मुंबई- वांद्रे पूर्वेकडील खैरनगर गणपती मंडळाच्या मंडपात गुरुवारी अजगर आढळून आला. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास जवळपास ५ ते ६ फूट लांबीचा अजगर असल्याने परिसरात भीतीने एकच खळबळ माजली.
मुंबईत गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात आढळला 'अजगर' - मुंबईत अजगर
वांद्रेत गुरूवारी गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना अचानक रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ५ ते ६ फूट लांबीचा अजगर मंडपात आढळून आला. यामुळे परिसरात भीतीने एकच खळबळ माजली. आरे पोलीस पोलीस व सर्पमित्र योगेश साटम यांनी अजगराला पकडून आरेतील जंगलात सोडले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मंडपात आढळला 'अजगर'
मंडळातील कार्यकर्त्यांना गणपती सजावटीची पूर्वतयारी करताना अचानक मंडपात अजगर असल्याचे निदर्शनास आले. मंडळातील कार्यकर्त्यांनी अजगराच्या भीतीने मंडपाबाहेर धाव घेतली. ही घटना समजताच आरे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई व सर्पमित्र योगेश साटम हे या मंडळाच्या मदतीला धावून आले. त्यांनी त्या अजगराला पकडून आरेतील जंगलात सोडले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
साटम यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.