महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्स सोबत महत्त्वाची बैठक, या मुद्दयांवर झाली चर्चा - covid task force

हॉटेल्स, मॉल्स आणि रेस्टॉरंटला वाढीव वेळ देता येऊ शकतो का? हॉटेल, मॉल्स आणि रेस्टॉरंट ला वाढीव वेळ दिला तर कोणते कडक नियम लागू केले गेले पाहिजेत.मंदिरे व प्रार्थनास्थळ खुली केली जाऊ शकतात का? मात्र सध्या प्रार्थनास्थळे आणि मंदिरे खुली करू नयेत असं मतं टास्क फोर्सच्या सदस्यांनी मांडल्याचे समजते.

cm uddhav thackrey
मुख्यमंत्री

By

Published : Aug 10, 2021, 6:53 AM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी साडेआठ वाजता टास्क फोर्स सोबत बैठक घेतली. रात्री उशीरा संपलेल्या या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील निर्बंध अजून शिथील करता येऊ शकतील का ? याबाबत टास्क फोर्सच्या सदस्य सोबत चर्चा केली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉल्सनां रात्री दहा वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात यावी अशा प्रकारची मागणी व्यावसायिकांकडून होत आहे.

याबाबतच्या पडताळणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बैठक घेतली होती. तसेच प्रार्थना स्थळे व मंदिरे हे देखील खुली करण्यात यावी अशीही मागणी जोर धरू लागली आहे. याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीमध्ये चर्चा केली. मात्र अद्याप हॉटेल्स, मॉल्स, रेस्टोरंट आणि मंदिरांबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

बैठकीत चर्चा केलेले मुद्दे
हॉटेल्स, मॉल्स आणि रेस्टॉरंटला वाढीव वेळ देता येऊ शकतो का? हॉटेल, मॉल्स आणि रेस्टॉरंट ला वाढीव वेळ दिला तर कोणते कडक नियम लागू केले गेले पाहिजेत. मंदिरे व प्रार्थनास्थळ खुली केली जाऊ शकतात का? मात्र, सध्या प्रार्थनास्थळे आणि मंदिरे खुली करू नयेत असे मतं टास्क फोर्सच्या सदस्यांनी मांडल्याचे समजते. 15 ऑगस्ट पासून दोन डोस घेणाऱ्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे. हा प्रवास करत असताना प्रत्येक स्टेशनवर क्यूआर कोड प्रणाली लावण्यात येणार आहे. क्यूआर कोड प्रणाली नेमकी कशी कार्यरत असेल याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. तसेच राज्याला संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आहे का? तसा धोका असल्यास दक्षता काय घेण्यात यावी. याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा -पुरामुळे हानी झालेल्या रस्त्यांबाबत फडणवीस गडकरींना भेटले, अर्थमंत्र्यांना केली 'ही' विनंती

ABOUT THE AUTHOR

...view details