महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईतील कांजूरमार्गमध्ये वॉचमनने केला 11 वर्षीय मुलीवर अत्याचार - girl molested by watchman

कांजूरमार्गमधील एका रहिवासी सोसायटीमध्ये काम करणाऱ्या वॉचमनने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत मुलीचा जबाब नोंदवून पोलिसांनी आरोपी विरोधात आयपीसी 354 आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच शुक्रवारी रात्रीच त्यााला अटक करण्यात आली आहे.

कांजूरमार्गमध्ये वॉचमनने केला 11 वर्षीय मुलीवर अत्याचार
कांजूरमार्गमध्ये वॉचमनने केला 11 वर्षीय मुलीवर अत्याचार

By

Published : Sep 18, 2021, 1:52 PM IST

Updated : Sep 18, 2021, 3:56 PM IST

मुंबई- मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरण ताजे असताना आणखी एक बलात्काराची घटना समोर आली आहे. कांजूर मार्गमधील रहिवासी सोसायटीच्या वॉचमनने एका 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वॉचमनला शुक्रवारी रात्री अटक केली आहे.

कांजूरमार्गमधील एका रहिवासी सोसायटीमध्ये काम करणाऱ्या वॉचमनने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने दोन वेळा तिच्यावर अत्याचार केला असल्याचे पीडित मुलीने जबाबात म्हटले आहे. या प्रकरणी मुलीचा जबाब नोंदवून पोलिसांनी आरोपी विरोधात आयपीसी 354 आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच शुक्रवारी रात्रीच त्याला अटक करण्यात आली आहे. आज या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

दरम्यान, सोसायटीची सुरक्षा ज्यांच्याकडे असते त्या सुरक्षा राक्षकानेच मुलीवर अत्याचार केल्याने संतापाची लाट उसळली आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरण-

गेल्याच आठवड्यात साकीनाका परिसरात एका उत्तर भारतीयाने एका महिलेवर पाशवी बलात्कार केला होता. त्यानंतर त्या पीडितेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे मुंबईत खळबळ उडालेली असताना आता सोसायटीची सुरक्षा रक्षकानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने संतापाची लाट उसळली आहे.

हेही वाचा - साकीनाका बलात्कार प्रकरण : आरोपीवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल; पीडितेच्या कुटुंबाला 20 लाखांची मदत

Last Updated : Sep 18, 2021, 3:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details