महाराष्ट्र

maharashtra

'जमिनीवर येऊन बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करा'

By

Published : Feb 6, 2020, 6:45 PM IST

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत ट्विट केले आहे.

amruta fadnavis
अमृता फडणवीस

मुंबई- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत ट्विट केले आहे. महाराष्ट्रातल्या स्थितीवर भाष्य करताना, जमिनीवर येऊन दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करा, असा सल्ला अमृता फडणवीस यांनी दिला आहे. फडणवीस यांनी वर्धा येथील हिंगणघाट आणि औरंगाबादच्या जळीत घटनांचा उल्लेख करत जनतेच्या रक्षणाची अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा - अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाल्या ‘ठाकरे’ नाव लावून...

गेल्या दोन महिन्यात चार अ‌ॅसिड हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्राध्यापक महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला. औरंगाबादमधील बलात्काराचे प्रकरण ऐकून त्रास होतो. आपल्यातली भांडणे विसरून सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महिला अत्याचाराच्या प्रकरणात पीडित महिलांसाठी "मनोधैर्य" ही योजना करण्यात आली होती. या योजनेतून पीडित महिलांना मदत करावी. तसेच महिला आयोगाच्या रिक्त अध्यक्षपदी त्वरित नेमणूक करावी, अशी मागणीही या ट्विटमध्ये करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details