मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून गायिका अमृता फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका ( Amruta Fadnavis slammed Nana Patole ) केली आहे. ट्विटर अकाउंटवर शायरीतून अमृता फडणीस यांनी पटोले यांच्यावर ( Amruta Fadnavis Shayari tweet ) निशाणा साधला आहे.
गोंदियात नागरिकांशी संवाद साधताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ( Nana Patoles controversial viral video ) झाला. पंतप्रधानांना मारण्याचा कट रचणे, असे गुन्हे नाना पटोलेंवर दाखल करण्याची मागणी भाजपच्या नेत्यांनी राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ( Police complaint against Nana Patole ) केली आहे.
हेही वाचा-Chandrakant Patil On Nana Patole : नाना पटोलेंच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार करणार : चंद्रकांत पाटील
अमृता फडणवीस यांनी नाना पटोलेंवर टीका
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नाना पटोलेंवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये शायरी ट्विट करून पंतप्रधान यांच्या कामगिरीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
"सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले !"
"पर इल्म नहीं है उन्हें के इस प्रगति की रोशनी को बुझाने की होड़ में,
खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले !"
हेही वाचा-Nana Patole Statement : मोदी नावाचा गावगुंड नसेल तर निश्चित माझ्यावर कारवाई करा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
नाना पटोलेंनी काय दिली आहे प्रतिक्रिया?
आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नाही. भंडारा येथे असलेल्या कार्यक्रमानंतर काही ग्रामस्थांनी स्थानिक गुंड असलेल्या मोदीबाबत आपल्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीवर बोलताना आपण केलेल्या वक्तव्यांचा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असल्याचे दाखवत प्रसारमाध्यमांवर फिरवला जात आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून राज्यभरात नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केल्याची मागणी केली जात आहे.