मुंबई -आज देशभरात फ्रेंडशिप डे साजरा (Friendship Day Celebration) केला जात आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Wife Tweet) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis Friendship Day Tweet) यांनी 'फ्रेंडशिप डे'संदर्भात एक सूचक ट्विट केले आहे. यामध्ये अमृता यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. 'ये दोस्ती हम नही तोड़ेंगे, महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत' असे कॅप्शन देखील अमृता फडणवीस यांनी या पोस्टला दिले आहे.
काय आहे ट्विटमध्ये? - देशभरात आज फ्रेंडशिप डे साजरा केला जात आहे. तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत फ्रेंडशिप डे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. राजकारणी देखील हा दिवस आपल्या राजकीय मित्रांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देत साजरा करत असतात. अशाच आगळ्यावेगळ्या शुभेच्छा देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिल्या आहेत. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस दिसत आहेत. या फोटोला साजेसे कॅप्शन देखील अमृता यांनी दिले आहे. 'ये दोस्ती हम नही तोड़ेंगे, महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत' असे कॅप्शन या पोस्टला अमृता फडणवीस यांनी दिले आहे.