मुंबई -शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज मुंबईतील शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांना घेऊन भाजपवर हल्लाबोल केला. यानंतर भाजप नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीदेखील राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया दिली. 'आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है', असे ट्विट करत त्यांनी राऊतांना टोमणा मारला आहे.
- अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया -
अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत यांना टोमणा मारला. आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है, असे सूचक ट्विट त्यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटची प्रचंड चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेनेच्या वाघाला बिल्ली संबोधल्यामुळे अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
- संजय राऊतांचे भाजपविरोधात रणशिंग -
केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारवर सुरू असलेल्या कारवाईविरोधात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रणशिंग फुंकले आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमैया, त्यांचे पुत्र नील सोमैया, मोहित कंभोज, देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. याला आता भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी (Amruta Fadnavis) संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.