मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. यामध्ये भाजपला चांगले यश मिळाले. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना याठिकाणी हवे तस यश मिळवता आले नाही. त्यामुळे भाजप नेते महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील पक्षांवर टीका करत आहेत. बिहार निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे भाजपच्या यशामुळेल मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. त्यातच देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज बिहार निवडणुकीवरून शिवसेना 'शवसेना' म्हणत जहरी टीका केली आहे.
शवसैना ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी-
राज्यात सत्तांतर झाल्यापासून अमृता फडणवीस यांचे शिवसेना आणि महाविकास आघाडीवरील टीकेचे बाण अद्यापही सुरूच आहेत. फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद गेल्यापासून अमृता फडणवीस यांनी अनेकवेळा शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केल्याचे दिसून आले आहे. आज त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. बिहार निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेवर टीकात्मक ट्विट करताना अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की, 'का हय ये - शवसैना ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी बिहार मे ! काय चाल्लय तरी काय - शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मधे ! महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बाबत धन्यवाद'
अमृता फडणवीस यांचे शिवसेनेवर टीकास्त्र अमृता यांनी देवेंद्र फडणवीसांनी एनडीएने बिहारमध्ये विजय मिळवल्यानंतर दिलेल्या मुलाखतीचा एक छोटा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये फडणवीसांनी शिवसेनेने कशाप्रकारे बिहारमधील निवडणुकीमध्ये खराब कामगिरी करत आपले हसे करुन घेतले आहे याबद्दल भाष्य केले आहे. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधीतरी बिहारमध्ये काही जागा निवडून यायच्या, मात्र आता तेही झालं नाही, असे म्हणते शिवसेनेबरोबर सध्या सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीलाही टोला लगावला आहे.
याचवरुन अमृता यांनी शिवसेनेने आपल्या साथीदारांना बिहारमध्ये ठार मारले, अशी टीका ट्विटवरुन केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी, “महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बाबत धन्यवाद,” असं म्हणत बिहारमधील मतदारांचे आभार मानले आहेत.
पेंग्विन लक्षवेधी-
अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटमध्ये पेग्विनचे चित्र वापरून आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केल्याचीही चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे.