मुंबईदेश अमृतमहोत्सव साजरा करत असताना चिंचपोकळी येथील विजय बजरंग मंडळानेही पंचात्तरी गाठली आहे. मुंबईकरांसाठी या मंडळाचा दहीहंडी उत्सव दरवर्षी आकर्षण आणि मार्गदर्शन ठरते. मात्र, दहीहंडी उत्सव Vijay Bajrang Mandal Dahi Handi धंदेवाईक झाला आणि या मंडळाने स्पर्धेला पूर्णविराम दिला आहे.
विजय बजरंग मंडळ देखील अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करणारआज काल दहीहंडी उत्सवाची स्पर्धा पाहायला मिळते. अनेक दहीहंडी मंडळे मुंबईसह राज्यात तयार झाली आहेत. नोंदणीकृत मंडळे देखील शेकडाभर असतील. त्यात चिंचपोकळीतील विजय बजरंग दहीहंडी मंडळाचे देखील नाव आहे. यंदा देशात अमृतमहोत्सवी Amrit Mahotsav वर्ष साजरा केला जातो आहे. हर घर तिरंगा हा उपक्रम सरकारने हाती घेतला आहे. तर दुसरीकडे विजय बजरंग मंडळ देखील अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे. पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करणारे मंडळ म्हणून सुमारे ६० वर्षे नावलौकिक आहे. आजवर थरांची, बक्षिसांची स्पर्धा सुरू असताना पैशासाठी कधीही गोविंदाचा जीव धोक्यात घातला नाही. धंदेवाईक गोविंदापथक म्हणून सण साजरा केला नाही, असे मंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट्ये सांगतात.