महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Municipal Commissioner Ink Thrown Case : न्यायालयाने सुनावली पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी - शाई फेक प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी

महापालिकेच्या आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर ( Municipal Commissioner Dr. Praveen Ashtikar )यांच्यावरील शाईफेक प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आरोपींना घेवून जातांना पोलीस
आरोपींना घेवून जातांना पोलीस

By

Published : Feb 15, 2022, 4:56 PM IST

Updated : Feb 15, 2022, 5:03 PM IST

अमरावती -अमरावती महापालिकेच्या आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर ( Municipal Commissioner Dr. Praveen Ashtikar ) यांच्यावर 9 फेब्रुवारी रोजी राजापेठ अंडरपास येथे शाईफेक ( Municipal Commissioner Ink Thrown Case ) करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच आरोपींना तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज (मंगळवारी) अमरावती न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ( Judicial custody ) सुनावली आहे.

माहिती देतांना रवी राणा यांचे वकील
काय आहे प्रकरण?

राजापूर उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या प्रकरणावरून उफाळून आलेल्या वादानंतर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना राजापेठ भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी बोलावले होते. भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी आलेल्या आयुक्तांवर युवा स्वाभिमान संघटनेच्या तीन महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली होती. या प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यासह एकूण अकरा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात एकूण पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये अजय बोबडे, संदीप गुल्हाने, सुरज मिश्रा, महेश फुलचंद आणि विनोद येवतीकर यांचा समावेश आहे. आज तीन दिवसांची कोठडी संपल्यावर न्यायालयाने या सर्वांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

'आमदार रवी राणा यांनी अटकपूर्व जामीन घेतला नाही'

याप्रकरणात बडनेराचे आमदार रवी राणा यांना सुद्धा पोलिसांनी आरोपी केले आहे. आमदार रवी राणा यांना या प्रकरणात कधी अटक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आमदार रवी राणा यांनी या प्रकरणात अद्याप अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नसल्याची माहिती त्यांचे वकील दीप मिश्रा यांनी दिली आहे.

हेही वाचा -अमरावती मनपा आयुक्तांवर महिलांनी केली शाईफेक; जय भवानी जय शिवाजी दिल्या घोषणा

Last Updated : Feb 15, 2022, 5:03 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details