मुंबई- बॉलीवुडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे. हॅकरने त्यांच्या प्रोफाईलवर बच्चन यांचा फोटा काढून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो टाकला आहे.
अमिताभ यांचे ट्विटर अकाउंट 'प्रो पाकिस्तान' या तुर्किश अय्यीलडीझ सायबर आर्मीने हॅक केल्याचा दावा केला आहे. हॅकरने पाकिस्तानचे कौतुक करत त्यांच्या मैत्रीसंबंधाचे गोडवे गायले आहेत. तर रमजान काळात मुस्लिमांवर हल्ले केल्याचा दावा करत भारतावर टीका केली आहे.
हॅकर ग्रुपने आयसलँड रिपब्लिकने तुर्कीश फुटबॉलपटुंशी गैरवर्तणूक केल्याबद्दल जगाचे लक्ष वेधत असल्याचे ट्विट केले आहे. हे ट्विट बिग बींच्या ट्विट खात्यावर अग्रभागी (पीन पोस्ट) ठेवण्यात आले आहे.