महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमित ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, 'त्या' शब्दाला जागण्याची केली विनंती - medical staff salaries issue

डॉक्टर व परिचारिकांना पूर्वी इतके वेतन न मिळाल्यास कोरोना विरोधात लढणारे डॉक्टर, नर्सेस हे योद्धे आहेत. या तुमच्या विधानाला कोणताही अर्थ उरणार नाही, असे लिहून अमित ठाकरेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्यांच्या शब्दाला जागण्यास सांगितलं आहे.

अमित ठाकरे
अमित ठाकरे

By

Published : May 19, 2020, 6:58 PM IST

मुंबई - कोरोनाच्या या बिकट काळात देवदूत म्हणून बंधपत्रित डॉक्टर व परिचारिका आपल्या सेवा बजावून मोलाचे कार्य करत आहेत. असे असताना राज्य शासनाने त्यांच्या मानधनात कपात केली आहे, हे कोणत्याही दृष्टीने पटणारे नाही, असे म्हणत राजपुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी ही कपात रद्द करण्याची मागणी केली आहे. तसे पत्र अमित ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, वित्तमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहले आहे.

पत्र
पत्र
पत्र

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने 20 एप्रिलला काढलेल्या अध्यादेशानुसार बंधपत्रित वैद्यकीय सेवकांचे मासिक मानधन 55 ते 60 हजार इतके निश्चित केले आहे. यापूर्वी सेवार्थ प्रणाली अंतर्गत मिळणारे भत्ते व मासिक वेतन मिळून 78 हजार मानधन मिळत होते. मात्र, नव्या आदेशानुसार मानधन कंत्राटी सेवा अंतर्गत निश्चित करण्यात आले आहे. जवळपास 20 हजार रुपये कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बंधीत परिचारिकांनाही पूर्वी इतके वेतन द्यावे. हरियाणा सरकारने वैद्यकीय व्यावसायिकांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्य सरकारच्या उदारपणाची तितकी अपेक्षा नसली तरी मानधन कपात करू नये, असे अमित ठाकरे यांनी सरकारला सुनावले आहे.

या डॉक्टर व परिचारिकांना पूर्वी इतके वेतन न मिळाल्यास कोरोना विरोधात लढणारे डॉक्टर, नर्सेस हे योद्धे आहेत. या तुमच्या विधानाला कोणताही अर्थ उरणार नाही, असे लिहून अमित ठाकरेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्यांच्या शब्दाला जागण्यास सांगितलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details