मुंबई :महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे( Shinde government ) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मुंबई मेट्रो 3 कारशेड ( Mumbai Metro 3 Carshed ) आरे कॉलनीत स्थलांतरित ( Migrated to Aarey Colony ) करण्याचा निर्णय घेतल्यानंतर,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे ( MNS leader Amit Thackeray ) यांनी नव्याने स्थापन झालेल्या सरकारला या निर्णयासंदर्भात पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.
धक्कादायक निर्णय : अमित ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करताना म्हटले आहे की, "नवीन सरकारचा हा नवा निर्णय मला आणि असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी आणि कार्यकर्ते यांना धक्कादायक आहे. राज्यातील तरुणांनी या निर्णयाविरोधात यापूर्वी जोरदार संघर्ष केला. काहींना तुरुंगातही टाकण्यात आले होते."
माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही : मनसे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमित ठाकरे पुढे म्हणाले की, "आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, ही आग्रहाची विनंती."