मुंबई- राज्यात कोरोना विरोधात प्रत्यक्षात देवदूत बनून अहोरात्र कोरोना बाधित रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी यांना देखील काही ठिकाणी त्याची लागण झाली. या सर्वांच्या रक्षणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज पीपीई किट्स, मास्कची मदत करण्यात आली.
कोरोनाशी लढा; डॉक्टरांसाठी कृष्णकुंजवरुन पीपीई किट्स, मास्क रवाना - मनसे अध्यक्ष राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरुन मनसे नेते अमित ठाकरे यांनी महाराष्ट्रातील डॉक्टरांसाठी पीपीई किट्स, मास्क आदी साहित्य दिले.
कृष्णकुंजवर उपस्थित डॉक्टर
कृष्णकुंज या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरुन मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील डॉक्टरांसाठी पीपीई किट्स, मास्क आदी साहित्य डॉक्टरांची नामांकित संस्था असलेल्या मार्डचे अध्यक्ष राहुल वाघ आणि त्यांच्या टीमकडे स्वाधीन केले. याप्रसंगी मनसे नेते नितीन सरदेसाई व विविध रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित होते.