मुंबई - विविध प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिकांचे आंदोलन ( Narses Agitation ) सुरू आहे. तोडगा काढण्यासाठी आज बैठक झाली, या बैठकीला संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत परिचारिकांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. सरकार परिचारकांच्या भावनांशी सहमत असून वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक अभ्यास करतील. यावर अभिप्राय मागवला असून यासंदर्भातील लेखी स्वरूपात शासनाच्या निर्णयाची प्रत आंदोलकांना दिली जाईल. संघटना त्यानंतर आपला संपाचा निर्णय मागे घेतील, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले. ( amit deshmukh on nurses strike ) मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते.
रुग्णवाढीला चौथ्या लाटेचा लेबल लावता येणार नाही - राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढू लागली आहे. रुग्ण वाढत असले तरी त्याला चौथ्या लाटेचा लेबल लावता येणार नाही. मात्र तज्ञांशी बोलून निर्णय घ्यावा लागेल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज ( amit deshmukh on covid ) स्पष्ट केले.