मुंबई - नागपूर येथे कर्करोग रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित ( cancer hospital in Nagpur Soon ) असून लवकरच बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी माहिती ( Amit Deshmukh on Nagpur Cancer Hospital ) हिवाळी अधिशनादरम्यान दिली.
विधान परिषदेचे सदस्य गिरीश व्यास, डॉ. रणजित पाटील ( MLA Dr Ranjit Patil question in assembly ) , अमरनाथ राजूरकर, नागोराव गाणार, अभिजीत वंजारी यांनी नागपूरमधील कर्करोग रुग्णालयाचा प्रश्न उपस्थित केला होता.
हेही वाचा-कर्करोग उपचारासाठी जपानने करावे अर्थसहाय्य; आरोग्यमंत्री टोपे यांची मागणी
यावर उत्तर देताना, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख ( Amit Deshmukh info on cancer Hospital ) म्हणाले, की या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर कोरोनाची पहिली आणि नंतर दुसरी लाट आली. सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी व उपचारांसाठी प्रयत्न सुरू केले. नागपूर येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून कर्करोग इन्स्टिट्युट ( Cancer Institute in Nagpur ) उभारण्यात येईल, असेही देशमुख म्हणाले. नागपूर येथील या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणारी यंत्रसामुग्री, उपकरणे, आस्थापनेवरील मनुष्यबळ या सर्वांसाठी प्रयत्न केले जातील.
हेही वाचा-ठाण्यात कर्करोगावर होणार उपचार; रुग्णालय उभारण्यास राज्य शासनाचा हिरवा कंदील