मुंबई - कोरोना विरोधातील लढाईत उद्योग समूह देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या समुहांच्या औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व (C.S.R) निधीच्या माध्यमातून वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून 'अमेरिकन इंडिया फाऊंडेशन'च्या माध्यमातून जे. जे. रुग्णालयाला 50 व्हेंटिलेटर देण्यात आले. यासाठी पालकमंत्री अस्लम शेख यांनी प्रयत्न केले.
अमेरिकन इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून जे. जे. रुग्णालयाला 50 व्हेंटिलेटर भेट - अस्लम शेख न्यूज
अमेरिकन इंडिया फाऊंडेशन'च्या माध्यमातून जे. जे. रुग्णालयाला 50 व्हेंटिलेटर देण्यात आले. यासाठी पालकमंत्री अस्लम शेख यांनी प्रयत्न केले.
जे.जे. रुग्णालयाला 50 व्हेंटिलेटर भेट
कोरोना विरोधातल्या लढाईत व्हेंटिलेटर्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोरोना विषाणूची लागण झालेल्या ज्या रुग्णांना श्वास घेण्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो.
कोरोनाबाधित रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी व्हेंटिलेटर अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे यापुढे देखील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची संख्या वाढवून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले.