मुंबईअँटिलिया प्रकरणानंतर पुन्हा अंबानी कुटुंबीयांना धमकी देण्यात Ambani family threatened again आली आहे. यावेळी रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या Reliance Foundation hospital डिस्प्ले क्रमांकावर धमकीचा फोन आला. कॉलरने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी दिली. यानंतर रुग्णालयातील लोकांनी याबाबत डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. एकूण 8 धमकीचे कॉल आल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलीस या कॉलची पडताळणी करत आहेत.
रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या फोनवरून धमकी देण्यात आली आहे. तीन तासात अंबानी कुटुंबीयांना संपवण्याचा धमकी फोनवरून मिळाली आहे. या संदर्भातील माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डीबी मार्ग पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने अंबानी यांच्या निवासस्थानी आणि हॉस्पिटल जवळ सुरक्षा वाढविली आहे. मागील वर्षी मुंबईतील अँटिलिया निवासस्थाने अशाच प्रकारे जेलीटीन नामक जेलिटन एका कारमध्ये सापडला होते. हे प्रकरण अद्यापही थंड झाले नसताना पुन्हा एकदा अंबानी कुटुंबीयांना धमकी आल्याने अंबानी कुटुंबीयांच्या सुरक्षात वाढ करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अंबानी कुटुंबीयांना यापूर्वीच मोठ्या प्रमाणात सुरक्षा बहाल करण्यात आलेली आहे.
पोलिसांचा तपास सुरूसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिलायन्स फाउंडेशनच्या हॉस्पिटलवर आज सकाळी 7 ते 8 वेळा धमकीचा फोन आला आहे. धमकी देणाऱ्याचे नाव अफजल असल्याच देखील फोनवर बोलत असताना सांगण्यात आले होते. संपूर्ण अंबानी कुटुंबाला 3 तासात संपवण्याची ही धमकी आली आहे. फोन दरम्यान व्यक्तीने मोठ्या घाणेरड्या शब्दांमध्ये शिवीगाळ देखील केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या संदर्भात डीबी मार्ग पोलिसांकडून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदणी सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. तसेच फोन कुठून आला या संदर्भात देखील शोध सुरू आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूदरम्यान रिलायन्स फाऊंडेशनने मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या धमकीच्या कॉलसंदर्भात तात्काळ माहिती दिला. त्यानंतर ज्या हद्दीत हे फाऊंडेशन येते त्या ठिकाणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. पोलिसांकडून धमकीचे फोन आलेल्या नंबरची तपासणी सुरू आहे. तसेच नागरिकांचे स्टेटमेंट नोंदवले जात आहेत. याशिवाय पोलिसांची एक टीम अंबानींच्या अँटिलिया या निवासस्थानीदेखील दाखल झाली आहे. त्याठिकाणची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.