मुंबई - एकनाथ शिंदे सरकार आपल्या पुरवणी मागण्यांत बुलेट ट्रेनसाठी Ambadas Danve Attack On Eknath Shinde Government तरतूद करते, मात्र घोषणा करूनही शेतकऱ्यांसाठी मदतीची तरतूदच केली नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार शिंदे सरकारने केला, असा हल्लाबोल विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी Ambadas Danve Attack On Eknath Shinde Government On Bullet Train Issue सरकारवर केला. सरकारने निधी देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबतही chhatrapati shivaji maharaj smarak हात आखडता घेतल्याचा आरोप दानवे यांनी करत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत शिंदे सरकारचा चांगलाच समाचार घेतला.
संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणीबाबत योजना केल्या रद्दशिंदे सरकारने २५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या Supplementary Demand सादर केल्या आहेत. मूळ अर्थसंकल्पाच्या तुलनेत ४.७१ टक्के एवढे हे प्रमाण आहे. आठ विभागांवर सभागृहात चर्चा ठेवण्यात आली आहे. या आठ खात्यांसाठी १० हजार कोटींची तरतूद आहे. पण उर्वरीत ज्या खात्यांवर १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, त्या खात्यांविषयी सभागृहात चर्चा न करताच त्याला मंजुरी दिली जाणे चुकीचे असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच संभाजी महाराज chhatrapati shivaji maharaj smarak व शाहू महाराज Chhatrapati Shahu Maharaj smarak यांच्या स्मारक उभारणीशी संबधित योजनाही शिंदे सरकारने रद्द केल्याचा आरोप दानवेंनी केला. गोडबोले समितीने सुचविल्याप्रमाणे विभागनिहाय ५ ते १० टक्के तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये कराव्यात, असे म्हटले होते. पण ही शिफारस सुद्धा पाळली नसल्याची टीका त्यांनी केली.