मुंबई- अॅमेझॉनमधील 'ऑनलाइन डिलिव्हरी बॉईज'च्या विविध मागण्यांना घेऊन सरकारविरोधात संपाची हाक दिली आहे. 10 हजारपेक्षा जास्त डिलिव्हरी करणारे कर्मचारी या संपात सहभाग घेणार आहेत, अशी माहिती 'इंडियन फेडरेशन ऑफ अँप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स' या संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस सलाउद्दीन शेख यांनी दिली आहे.
अॅमेझॉनचे 10 हजार डिलिव्हरी बॉईज जाणार संपावर - अॅमेझॉन डिलिव्हरी बॉईजच्या समस्या
सध्या कोरोना काळात सर्वच उद्योग धंद्यावर आर्थिक अडचणीत सापडलेल्या आहे. त्यामुळे कामगार कपात आणि कमिशन कपात मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तसेच वाढत्या इंधन दरवाढीमुळे डिलिव्हरी बॉईजनासुद्धा बसला आहे. त्यामुळे डिलिव्हरी बॉईजच्या कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती.
डिलिव्हरी बॉयची आर्थिक पिळवणूक -
सध्या कोरोना काळात सर्वच उद्योग धंद्यावर आर्थिक अडचणीत सापडलेल्या आहे. त्यामुळे कामगार कपात आणि कमिशन कपात मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तसेच वाढत्या इंधन दरवाढीमुळे डिलिव्हरी बॉईजनासुद्धा बसला आहे. त्यामुळे डिलिव्हरी बॉईजच्या कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती. ज्यात डिलिव्हरी बॉईजना छोट्या पार्सलसाठी २० रुपये, तर एचडी पार्सलसाठी प्रत्येकी २५ रुपयांचा मोबदला हवा आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे सारख्या शहरात अॅमेझॉनचे १० हजारांहून अधिक डिलिव्हरी बॉईज काम करत आहेत. त्यात डिलिव्हरी असोसिएट्स आणि डिलिव्हरी बॉय यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे. म्हणूनच संघटनेने विविध मागण्या करत संपाची हाक दिली आहे. कंपनीने कितीही दबाव आणला, तरी काम बंद आंदोलन मागे घेणार नसल्याचे शेख यांनी स्पष्ट केले आहे.
अतिरिक्त वेळ काम करावे लागते-
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात मुंबई व पुणेसारख्या इतर शहरातही डिलिव्हरी बॉईज स्वतःच्या जीवाची काळजी न करता घरोघरी जाऊन पार्सल पोहच करत आहेत. तरीही कंपनीने पार्सलचे दर कमी केल्याने डिलिव्हरी बॉईजच्या उत्पन्नात कपात होणार असल्याचा दावा सलाउद्दीन शेख यांनी केला आहे. तर डिलिव्हरी बॉईज दिवसाला ८ ते १० तास काम करतात. दिवसभरात सरासरी ८० ते १०० पार्सल्स पोहोच करण्याचे आव्हान असते, हे उद्दीष्ट पूर्ण झाले नाही, तर अतिरिक्त वेळ काम करावे लागते, असेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.