मुंबई - मराठीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक होत काल काही ठिकाणी अॅमेझॉनच्या कार्यालयांची तोडफोड केली होती. यानंतर अॅमेझॉन कंपनीने नमते घेतल्याचे चित्र आहे. कंपनीने त्यांच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिली माहिती दिली.
अॅमेझॉन नरमली... 'खळ्ळ फट्याक' झाल्यानंतर अखेर मराठी भाषेचा समावेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश असावा, ही मागणी कंपनीने मान्य केल्याचे चित्रे यांनी सांगितले. लवकरच आपल्या वेब पेजवर आणि मोबाइल अॅपवर भाषा निवडताना मराठीचा पर्याय देणार असल्याचे कंपनीने आश्वासन दिले आहे, असे ते म्हणाले. शुक्रवारी फटाके फुटल्यावर अॅमेझॉन प्रशासन खडबडून जागं झालं. यासोबतच अॅमेझॉनकडून राज ठाकरेंची दिलगिरी व्यक्त करण्यात आली. ५ तारखेला सर्व केसेस रद्द करणार आल्याचेही कंपनी व्यवस्थापनाने स्पष्ट केल्याचे चित्रे यांनी सांगितले.
काल केली होती तोडफोड
अॅमेझॉनने त्यांच्या अॅपमध्ये मराठीचा समावेश करावा, या मागणीसाठी मनसे अधिक आक्रमक झाली. काल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुणे आणि मुंबईतील अॅमेझॉनची कार्यालयं फोडली होती. मनसे कार्यकर्त्यांनी चांदिवली येथील अॅमेझॉनच्या कार्यालयात घुसून तोडफोड देखील केली. याआधी अॅमेझॉनचे पुण्यातील कार्यालय देखील फोडण्यात आले होते.
काय आहे संपूर्ण प्रकरण? अॅमेझॉन या इ-कॉमर्स कंपनीच्या अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश असावा, अशी मागणी मनसेने केली होती. मात्र कंपनीने हे शक्य सांगितल्याने सांगितल्याने मनसे विरुद्ध अॅमेझॉन अशी लढाई सुरू झाली होती. मनसेने देखील आक्रमक होत 'मराठी नाही; तर अॅमेझॉन नाही' अशी मोहीम सुरू केली. अॅमेझॉन मराठी भाषेचा समावेश करत नाही, तोपर्यंत ही मोहीम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. अॅमेझॉनच्या वतीने राज ठकरे यांची माफी मागण्यात आल्याचे मनसेने सांगितले आहे. अॅमेझॉन नरमली... 'खळ्ळ फट्याक' झाल्यानंतर अखेर मराठी भाषेचा समावेश तसेच यासंबंधी पत्र आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. मनसे नेते आणि अॅमेझॉन व्यवस्थापनातील अधिकारी यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा पार पडली. तसेच यानंतर अखिल चित्रे यांना अॅमेझॉनतर्फे इ-मेल करण्यात आला आहे. यामध्ये अन्य भारतीय भाषांप्रमाणेच मराठी भाषेचा समावेश करणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. तसेच यासाठी आवश्यक तांत्रिक गोष्टींसाठी काही वेळ मागण्यात आल्याचं या मेलमध्ये नमूद करण्यात आलंय. ही प्रक्रिया लवकरच पार पडणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कंपनीने त्यांच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. अॅमेझॉनची न्यायालयात धाव
या पार्श्वभूमीवर अॅमेझॉनने मनसे विरुद्ध मुंबईतील दिंडोशी येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली. अॅमेझॉनच्या याचिकेवरून न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेत्यांना नोटिसा बजावल्या. अॅमेझॉनच्या कामात मनसेने कोणताही अडथळा आणू नये. मनसेवर अॅमेझॉनने जे आरोप केले आहेत, त्यावर १३ जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर द्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. राज यांनी ५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावे, असेही नमूद करण्यात आले आहे. गुरुवारी या नोटिसा बजावण्यात आल्या असताना शुक्रवारी त्याचे पडसाद पाहायला मिळाले. मात्र अखेर आज शनिवारी या प्रकरणावर पडदा टाकण्याचे संकेत अॅमेझॉनने दिले आहेत. याविषयी त्यांनी मनसेला स्पष्टीकरण देखील दिले आहे. अखेर कंपनी व्यवस्थापनाने मराठी भाषेचा समावेश करण्यात हिरवा कंदील दिला आहे.