मुंबई: राज्यासह देशभरात भाज्यांचे भाव कडाडले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे वाहतूक खर्चात वाढ झाल्याने सर्व वस्तूंचे भाव कडाडत आहेत. यंदा पाऊस जरी चांगला झाला असला, तरी तूर मसूर आणि उडीद उत्पादनात फारसा फरक पडलेला नाही. परिणामी देशातील डाळींचे उत्पादन कमी ( Pulses Production Decreased in country ) झाले आहे.
डाळीची गरज आणि उपलब्धता - दरवर्षी देशात सुमारे ४५ लाख टन तूर डाळीची गरज भासते. मात्र यंदा केवळ 35 लाख टन तूरडाळ उपलब्ध आहे. मसूर डाळीची सुमारे २२ लाख टन मागणी असते. मात्र यंदा केवळ १४ लाख टन मसूर डाळीचे उत्पादन ( Production of lentils ) झाले आहे. यासाठी कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये काही लाख टन डाळ तयार केली जाणार आहे. उडीद डाळीची २५ लाख टनांची मागणी असते. ही सुद्धा यंदा कमी प्रमाणात उत्पादित झाली आहे. सध्या देशात उडीद डाळीचा तुटवडा असल्यामुळे केंद्र सरकारने आयात खुली केली आहे. त्यानुसार म्यानमारमधून तूर डाळ आयात ( Import of pulses from Myanmar ) केली जात आहे. ऑगस्टमध्ये पूर्व आफ्रिकेतून डाळ मागवली जाणार आहे. केंद्र सरकारने आयात सुरू ठेवल्यास डाळीचा तुटवडा कमी होईल, असा दावा इंडिया पल्सेस अँड ग्रेन असोसिएशनचे अध्यक्ष विमल कोठारी यांनी केला आहे.