मुंबई - कोरोनाचा वाढता संसर्ग, रुग्णांची होणारी हेळसांड आणि दवाखान्यांवर पडणारा ताण लक्षात घेऊन ‘यशवंत चॅरिटेबल ट्रस्ट' व 'डॉक्टर्स फॉर यू’ या संस्था मुंबईच्या मागाठाणे परिसरात स्वखर्चाने कोविड केअर सेंटर सुरू करू इच्छित आहे. त्यामुळे या संस्थांना सेंटर उभारणीसाठी तातडीने परवानगी द्या, अशी मागणी विधान परिषदचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महापालिकेला पत्र लिहून केली आहे.
"चॅरिटेबल ट्रस्टला कोविड सेंटर उभारण्यास परवानगी द्या"
'यशवंत चॅरिटेबल ट्रस्ट' व 'डॉक्टर्स फॉर यू' या अशासकीय संस्था असून या मागाठाणे भागात स्वखर्चाने कोविड केअर सेंटर सुरू करण्यास तयार आहेत. त्यासाठी या संस्थांनी मुरबली देवी खेळाचे मैदान, जलतरण तलाव व व्यायाम शाळा, शुक्ला कंपाऊंड, मागाठाणे, दहिसर (पूर्व) येथे कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी परवानगी मागितली आहे.
'यशवंत चॅरिटेबल ट्रस्ट' व 'डॉक्टर्स फॉर यू' या अशासकीय संस्था असून या मागाठाणे भागात स्वखर्चाने कोविड केअर सेंटर सुरू करण्यास तयार आहेत. त्यासाठी या संस्थांनी मुरबली देवी खेळाचे मैदान, जलतरण तलाव व व्यायाम शाळा, शुक्ला कंपाऊंड, मागाठाणे, दहिसर (पूर्व) येथे कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी परवानगी मागितली आहे. प्रवीण दरेकरांनी यासाठी पुढाकार घेत या सेंटर्सना तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई महानगरपालिकेला केली आहे. त्यामुळे तेथील स्थानिक रुग्णालये व अन्य कोविड सेंटरवरील ताण कमी होईल, असेही प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले.