मुंबई -गेल्या काही दिवसांपासून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे एनसीबी आणि समीर वानखेडेंसदर्भात नवनवीन गौप्यस्फोट करत आहेत.याच दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणातील एक पंच प्रभाकर साईल यांनी एक प्रतिज्ञाप्रत्र सादर करत ड्रग्ज प्रकरणात 25 कोटीची खंडणी मागितली गेली असल्याचा खुलासा केला होता. त्याप्रतिज्ञापत्राची नोटरी करणारे वकिल रामजी गुप्ता यांचे एक कथित स्टिंग ऑपरेशन मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष मोहित कंभोज यांनी पुढे आणले आहे. त्याचा व्हिडीओदेखील त्यांनी ट्वीट केला आहे.
प्रभाकर साईल यांचे प्रतिज्ञापत्र खोटे? मोहित कंभोज यांनी ट्वीट केला नोटरी करणाऱ्या वकिलाचा व्हिडीओ - मुंबई ताज्या बातम्या
पंच प्रभाकर साईल यांनी एक प्रतिज्ञाप्रत्र सादर करत ड्रग्ज प्रकरणात 25 कोटीची खंडणी मागितली गेली असल्याचा खुलासा केला होता. त्याप्रतिज्ञापत्राची नोटरी करणारे वकिल रामजी गुप्ता यांचे एक कथित स्टिंग ऑपरेशन मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष मोहित कंभोज यांनी पुढे आणले आहे.
Mohit Kamboj tweet
या स्टींग ऑपरेशनमध्ये प्रभाकर साईल यांनी पैशांसाठी हे प्रतिज्ञापत्र तयार केले असल्याचा दावा मोहीत कंभोज यांनी केला आहे. तसेच याप्रकरणात मंत्री नवाब मलिकांचा हात असून केवळ स्वत: वयक्तीक फायद्यासाठी आणि केंद्राला बदनाम करण्यासाठी त्यांनी हे केले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ही मोहित कंभोज यांनी केली आहे.
हेही वाचा -समीर वानखेडे दिल्लीला पोहचले, म्हणाले महत्वाच्या कामासाठी आलोय