मुंबईराष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) NIA interrogated salim fruit नुकतेच विशेष न्यायालयात सांगितले की मोस्ट वॉन्टेड गुंड दाऊद इब्राहिमशी Daud Ibrahim कथित संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या गँगस्टर सलीम फ्रुटवाला investigation of salim fruitwala आणि त्याच्या टोळीकडून डी कंपनीच्या नावाने धमकी threaten by d company देण्यात आली. कुरेशीला एनआयए अटक NIA arrested Qureshi करून विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्या. बीडी शेळके यांनी कुरेशीला 17 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी NIA Custody सुनावली. एनआयएने कुरेशीची १५ दिवसांची कोठडी मागितली होती. डी गँगच्या साथीदारांनी बिल्डर्ससह किती लोकांना धमकावले याची चौकशी केली जाणार आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याचा प्रमुख साथीदार छोटा शकीलने बेकायदेशीरपणे मालमत्ता खरेदी केल्या होत्या.
एनआयने देशातील २९ ठिकाणांचा ठावठिकाणा घेतला एनआयएने न्यायालयात दिलेल्या युक्तिवादानुसार एजन्सीने मे महिन्यात देशभरात 29 ठिकाणी शोध घेतला होता. शहरातील विविध मालमत्तांच्या तपशिलांसह 10 हजारपेक्षा अधिक पानांची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. कुरेशीकडून मालमत्तेची कागदपत्रेही सापडल्याचा दावा एनआयएने केला आहे. कुरेशीचे वकील विकार राजगुरु यांनी न्यायालयाला माहिती दिली की त्यांचा क्लायंट केमिस्टचे दुकान चालवतो आणि तो रिअल इस्टेट एजंट देखील आहे. त्यामुळे त्याचा बांधकाम व्यावसायिकांनी पाठवलेल्या अनेक प्रस्तावांमध्ये सहभाग आहे. एनआयएला एकाही मालमत्तेची ओळख पटलेली नाही असा दावा त्यांनी केला. तथापि एनआयएने असा दावा केला आहे की त्यांनी फॉरेन्सिक ऑडिटर्समार्फत चौकशी सुरु केली आहे आणि धमक्या देऊन ताब्यात घेतलेल्या प्रमुख ठिकाणांवरील दोन मालमत्तांचे तपशील सापडले आहेत. याप्रकरणी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे एजन्सीने सांगितले. कागदपत्रांबाबत विचारणा केली असता कुरेशी याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि तपासाची दिशाभूल केली. त्यामुळे त्याची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे असे एनआयएने न्यायालयासमोर सांगितले.