महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pankaja Munde : 'सर्व समाजाच्या घटकांना मंत्रिमंडळात संधी मिळेल' मंत्रिमंडळ विस्तारावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची सूचक प्रतिक्रिया - मंत्रिमंडळ विस्तार

"सर्वसाधारणपणे कोणत्याही मंत्रिमंडळात सर्व जाती आणि वर्गाला स्थान मिळेल याची काळजी घेतली जाते. त्यामुळे राज्यातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात ( Cabinet expansion ) सर्वांनाच प्रतिनिधित्व मिळेल." अशी सूचक प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) दिली आहे.

Pankaja Munde
पंकजा मुंडे

By

Published : Jul 20, 2022, 10:33 PM IST

मुंबई - शिंदे-फडणवीस ( Shinde Fadnavis Govt ) यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराची राज्यातील जनता वाट पाहत असतानाच कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस सरकारच्या काळात मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांचे नाव मंत्रीपदी येणार का? याची उत्सुकता अनेकांना आहे. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या बीडमध्ये पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून होम हवन करण्यात आलं होत. अशा स्थितीत खुद्द पंकजा मुंडे यांनी यावर भाष्य केले आहे. आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या मंत्रिपदाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

मंत्रिमंडळ विस्तारावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

सर्व घटकांना संधी -यावेळी ओबीसींना ( OBC ) मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मुंडे म्हणाल्या की, "सर्वसाधारणपणे कोणत्याही मंत्रिमंडळात सर्व जाती आणि वर्गाला स्थान मिळेल याची काळजी घेतली जाते. त्यामुळे राज्यातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात सर्वांनाच प्रतिनिधित्व मिळेल." अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी त्यांचे समर्थक नि:संशयपणे आग्रही असताना आता फडणवीस आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde Group) यांच्या गटाने दाखल केलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात गुंतलेल्या विविध गुंतागुंतीच्या मुद्द्यांमुळे सरन्यायाधीशांनी या प्रकरणात मोठ्या खंडपीठाची गरज व्यक्त केली. मात्र गटनेता निवडणे हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आणि बहुसंख्य गट गटनेत्याची नियुक्ती करू शकतो, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने सुनावणीदरम्यान नोंदवले. न्यायालयाने सर्व पक्षकारांना २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञा पत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. यात मंत्रिमंडळ विस्तारा बाबत कोणताही निर्णय न्यायालयाने दिला नसल्याने येत्या काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार केल्या जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा -BMC Election : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी

शिंदे फडणवीस चर्चेची शक्यता -सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) आजच्या सुनावणीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळ विस्ताराला अंतिम रूप दिले जाईल. मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात आज ना उद्या चर्चा होण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ स्थापनेसाठी शिंदे गट आग्रही -राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पुन्हा एकदा आंदोलन सुरू झाले आहे. एकनाथ शिंदे गट या आठवड्यात विस्तारासाठी जोर देत आहे, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) आज ना उद्या चर्चा करतील. या महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला हवा, असे दिल्लीतील भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. आगामी पावसाळी ( Monsoon session ) अधिवेशन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार असून त्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे जवळपास दिसून येत आहे. मात्र, अद्याप तारीख स्पष्ट झाली नसल्याचे मत भाजप नेत्यांकडून व्यक्त केलं जातं आहे.

हेही वाचा -OBC Reservation : दोन आठवड्यात निवडणुका घ्या; न्यायालयाची दिशाभूल करू नका : सर्वोच्च न्यायालय

ABOUT THE AUTHOR

...view details