मुंबई - दहीहंडीबाबत जे निर्बंध आहेत, ते केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आहेत. केंद्र सरकार जशा सूचना देईल त्यानुसार राज्य सरकार या सूचनांची अंमलबजावणी करते. अशी माहिती शेवाळे यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान, विलेपार्ले पूर्वेत शिवा सालूट सलूनचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. विलेपार्लेमध्ये आर्मीचे जवान व मुंबई पोलिसांसाठी हा पहिला सलून उघडण्यात आला आहे.
पत्रकारांशी बोलताना शिवसेना खासदार राहुल शेवाळे अभ्यास न करता व कुठल्याही माहिती न घेता बोलतात
जर केंद्र सरकारने परवानगी दिली तर राज्य सरकार दहीहंडीसह मंदिरही उघडी करेस. मात्र, केंद्र सरकारचे निर्बंध असल्यामुळे तसे करता येत नाही असही शेवाळे यावेळी म्हणाले आहेत. अभ्यास न करता व कुठल्याही माहिती न घेता हे लोक आंदोलन करत आहेत. असही ते म्हणाले.
हा योगायोग नाही तर हे हे बरोबर प्लानिंग
जे केंद्र सरकारच्या माध्यमातून राजकारण चालू आहे, ते दुर्दैवी आहे. शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा कुठलाही दोष नाही. त्यांच्यावरील कारवाई केवळ सुडबुद्धीने केली जात आहे. शिवसेनेच्या कठीण काळात परब यांनी चांगले काम केले आहे. त्यावरील राघ भारतीय जनता पक्ष केंद्र सरकारच्या माध्यमातून काढत आहे असही शेवाळे यावेळी म्हणाले आहेत. जन आशीर्वाद यात्रा संपल्यानंतर परब यांना ही नोटीस आली आहे. त्यामुळे हा योगायोग नाही तर हे हे बरोबर प्लानिंग आहे असही ते यावेळी म्हणाले आहेत.