मुंबई - भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबईत काल रात्री पासून मुसळधार पाऊस पडत असल्याने शहरात पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमधील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये बंद ठेवण्याचे तसेच अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केले आहे.
- मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू;एनडीआरएफच्या पाच तुकड्या तैनात.
- उच्च न्यायालयातील आज होणाऱ्या सर्व सुनावण्या रद्द; मुख्य न्यायाधीशांनी न्यायालयीन कामाकाजाला सुट्टी केली जाहीर
- सकाळी ८. १५ नंतर चर्चगेट आणि दादर स्थानाकातून धावणाऱ्या सर्व लोकल रेल्वेसेवा बंद करण्यात आल्या आहेत. मुंबईत मुसळधार..
- शहरात आणि रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने मध्य रेल्वेसेवा प्रभावित झाली आहे. रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळा पत्रकात बदल केला आहे. त्यामध्ये मुंबई भुवनेश्वर या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. हावडा-मुंबई आणि हैदराबाद-मुंबई या ठाणे ठाणे स्टेशनपर्यंत धावतील तर गदग-मुंबई कल्याणपर्यंत धावेल. मुंबईत मुसळधार
- गेल्या २४ तासात मुंबईत १७३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
- मुंबईतील नायर रुग्णालयातील कोरोना केअर सेंटरमध्ये शिरले पावसाचे पाणी
- मुंबईतील वाहतूक वळवली.