मुंबई -ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात गुन्हे दाखल झालेल्या काही नागरिकांना मोठ्या दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी, नागरिकांवर लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल IPC 188 अंतर्गत दाखल झालेले सर्व खटले राज्य गृह विभागाने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाला मंजुरी मिळाल्यानंतर खटले मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
१८८ अंतर्गत दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेणार - “कोविडच्या काळात ज्या नागरिक किंवा विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या त्यांना विविध अडचणी येत आहेत. त्यांना पासपोर्ट मिळवताना, परदेशात जाण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही तत्वत: १८८ अंतर्गत दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेणार आहोत. मंत्रिमंडळात या विषयावर निर्णय घेण्यात येईल” असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.