महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Covid Restrictions Revoked Maharashtra : मोठी बातमी.. राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले.. - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील नागरिकांना मोठी भेट दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले ( Covid Restrictions Revoked Maharashtra ) आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट ( Minister Jitendra Awhad Tweet ) करून यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय ( Maharashtra State Cabinet Decision ) घेतला.

मोठी बातमी.. राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले..
मोठी बातमी.. राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले..

By

Published : Mar 31, 2022, 5:13 PM IST

Updated : Mar 31, 2022, 6:42 PM IST

मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त राज्य सरकारने राज्यातील नागरिकांना मोठी भेट दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले ( Covid Restrictions Revoked Maharashtra ) आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली ( Minister Jitendra Awhad Tweet ) आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला ( Maharashtra State Cabinet Decision ) आहे. यामध्ये मास्क वापरणे ऐच्छिक करण्यात आले आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे. राज्य मासमुक्त केले असून, मास्क घालणे ऐच्छिक असल्याचे टोपे यावेळी म्हणाले.

काय म्हटले आहे आव्हाड यांनी ट्विट मध्ये : आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले.गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा. रमजान उत्सहात साजरा करा. बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा, असे आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला निर्णय : गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केला.


लस घेणे आवश्यक : कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.


मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले : गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील धन्यवाद दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला. पोलीस यंत्रणा, पालिका नगरपालिका महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच राज्यातील सर्व जनतेला नववर्षापासून नवीन संकल्प करु या, असे आवाहन करत गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Last Updated : Mar 31, 2022, 6:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details