मुंबई : हैदराबादमधील नेहरू प्राणी संग्रहालयातले ८ सिंह करोना पॉझिटिव्ह आढळून आढळून आले आहेत. यामुळे भारतात प्राण्यांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाल्याचे समोर आले आहे. मुंबईमधील राणीबागेत म्हणजेच जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात सिंह नसले तरी वाघ, बिबट्या आदी इतर अनेक प्राणी आहेत. त्यांची सेंट्रल झू ऍथॉरिटीने दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे काळजी घेतली जात आहे. यामुळे गेले वर्षभर कोरोनाचा मुंबईत प्रसार असला तरी प्राण्यांना त्याची लागण झालेली नाही अशी माहिती राणीबाग प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोरोना काळात राणीबागेत प्राण्यांची अशी घेतली जात आहे काळजी
जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात सिंह नसले तरी वाघ, बिबट्या आदी इतर अनेक प्राणी आहेत. त्यांची सेंट्रल झू ऍथॉरिटीने दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे काळजी घेतली जात आहे. यामुळे गेले वर्षभर कोरोनाचा मुंबईत प्रसार असला तरी प्राण्यांना त्याची लागण झालेली नाही अशी माहिती राणीबाग प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हैदराबादमध्ये ८ सिहांना कोरोची लागण
गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये ८ वाघ आणि सिंहांना करोनाचा संसर्ग झाला होता. देशात प्रथमच हैदरबादमधील ८ सिंहांना करोनाचा संसर्ग झाल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सांगितलं आहे. संसर्ग झालेल्या सिंहांना आयसोलेट करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचाराला सिंह चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांचं खाणं आणि वर्तन सामान्य आहे. खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पर्यटकांसाठी प्राणिसंग्रहालय बंद करण्यात आलं आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्रालयाने दिली आहे.
मुंबईत अशी घेतली जाते काळजी
मुंबईत ५२ एकर जागेवर राणीबाग आहे. यात वाघ, बिबट्या, तरस, अस्वल, हत्ती, पाणघोडा आदी ३०० हून अधिक प्राणी आणि पक्षी आहेत. गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनाच्या काळात आणि त्याआधीसुद्धा सेंट्रल झू ऍथॉरिटीच्या गाईडलाईनप्रमाणे प्राणी आणि प्राणी संग्रहालयाची काळजी घेतली जात आहे. राणीबागेत वेळोवेळी स्वच्छता आणि सॅनिटायझेशन केले जात आहे. कर्मचाऱ्यांना कामावर आल्यावर आंघोळ करून त्यांना सॅनिटाईझ केले जाते. त्यानंतरच त्यांना पिंजऱ्याजवळ जाऊ दिले जाते. प्राण्यांची काळजी घेण्यासाठी राणीबागेत २४ तास डॉक्टर्स आणि कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्येक पिंजऱ्याजवळ जाऊन प्राण्यांची तपासणी केली जात असल्याचे राणी बाग प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मागील वर्षी अशी घेतली होती काळजी
मागील वर्षात मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यावर लॉकडाऊन लागू करण्यात आला. लॉकडाऊन असल्याने कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था राणीबागेत करण्यात आली होती. त्यांना राणीबागेच्या बाहेर जाण्यास परवानगी नव्हती. कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोयही राणीबागेत करण्यात आली होती. यामुळे मागील वर्षापासून राणीबागेत प्राणी किंवा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
उन्हाळ्यात विशेष काळजी
प्राण्यांना देण्यात येणारे अन्न आणि फळ थंड करून देण्यात येत आहेत. विविध प्रकारच्या फळांचा थंडगार केकही दिला जात आहे. नैसर्गिक अधिवासाप्रमाणे प्राण्यांना गुहा, डबकी, झुडपे तयार करण्यात आली आहेत. डबक्यातील पाणी प्रवाही असल्याने स्वच्छ आणि थंडगार राहत आहे. पक्ष्यांसाठीही भाजलेले चणे, शेंगदाणे, चिकू, पेरू, भोपळा, मध, गाजर, अशी फळे दिली जात आहेत.