मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन करायचे की नाही, असा प्रश्न जनतेला विचारल्यानंतर राज्य सरकारने अनलॉक-२ची अधिसूचना जारी करत ३१ जुलैपर्यंत निर्बंध कायम राहतील, असे स्पष्ट केले. याबाबत विविध स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्रातील सद्यस्थितीबाबत काही नागरिकांनी राज्य सरकार तर काहींनी केंद्राला दोषी ठरवले आहे.
#Unlock २.० : 'नागरिकांच्या मनात अद्याप संभ्रम कायम' - ऑल बँक असोसिएशनचे उपाध्यक्ष विश्वास उटगी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन करायचे की नाही, असा प्रश्न जनतेला विचारल्यानंतर राज्य सरकारने अनलॉक-२ची अधिसूचना जारी करत ३१ जुलैपर्यंत निर्बंध कायम राहतील, असे स्पष्ट केले. याबाबत विविध स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
ऑल बँक असोसिएशनचे उपाध्यक्ष विश्वास उटगी यांनी कोरोना लॉकडाऊन आणि 'अनलॉक' यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल केंद्र सरकारला दोषी धरले आहे. लोकांच्या मनात संभ्रम आहे का याबद्दल 'ईटीव्ही भारत'ने त्यांना विचारल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसात कोरोना नियंत्रणात येईल, असे सांगत महाभारत जेखील 18 दिवसांत संपल्याचा दाखला दिला.
आता लॉकडाऊनला जवळपास शंभर दिवस पूर्ण होत आहेत. मात्र केंद्रीय पातळीवर राज्य सरकारला कुठलेही सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राने मृत्युदरावर चांगले नियंत्रण मिळवले असून केरळ सरकारचे कोरोना नियंत्रण जागतिक पातळीवर प्रशंसनीय ठरले आहे. कोरोना हा केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे भारतात आला असून नियंत्रणाच्या बाबतीत पूर्णतः केंद्र सरकार अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले.